Clash between two groups of migrant workers in Banda
बांदा कट्टा कॉर्नर येथे शनिवारी रात्री दोन परप्रांतीय कामगारांच्या गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. शनिवारी दुपारी घडलेल्या किरकोळ कारणावरून सदरचा वाद रात्री साडे आठच्या सुमारास उफाळून आला.मात्र याबाबतची कोणतीच तक्रार बांदा पोलिसात देण्यात आली नाही. मारामारी नंतर या प्रकरणावर आपापसांत मिटवून पडदा टाकण्यात आला. या राड्याची बांदा परिसरात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. तर दिवसेंदिवस परप्रांतीय कामगारात रोजच्या रोज होणाऱ्या किरकोळ भाडणाचे रूपांतर मारामारीत होत असल्याने यांना बांदा पोलिसांनी आवर घालावा अशी मागणी होत आहे.
बांदा शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार राहतात. किरकोळ कारणावरून त्यांच्यात रोज भांडणे होत असतात. शनिवारी रात्री सुद्धा तसेच झाले दुपारी झालेल्या किरकोळ वाद शनिवारी रात्री उफाळून आला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रात्रीच्या वेळी कट्टा कॉर्नर परिसरात झालेल्या या मारामारीची बातमी बांदा शहरात पसरली.त्यावेळी काही स्थानिक सुद्धा धावून गेले मात्र त्यांचा आपापसात वाद असल्याने त्याबाबत कोणी विचारणा केली नाही मात्र त्यातील एक गट आपण पोलिसात जाणार अशी धमकी समोरच्या गटाला देत होता मात्र रविवारी पोलिसांना विचारले असता अशी कोणतीच तक्रार आपल्या पर्यंत आली नसल्याचे बांदा पोलिसांनी सांगितले.
बांदा / प्रतिनिधी