कासेगाव वार्ताहर
वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे पुणे बेंगलोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. नेर्ले येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुमारे सहा ते सात महिन्याच्या मादी बिबट्याला वाहनाची धडक बसली. ही घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. वनाधिकारी सुरेश चरापले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र जबर मार बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या आई समवेत रस्ता ओलांडून पलीकडे जाताना ही घटना घडली असावी असा अंदाज वनाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








