भांडय़ांमधून मिळाली अनेक प्रकारची सामग्री
इस्रायलच्या समुद्रकिनाऱयानजीक एका जहाजाचे अवशेष मिळाले आहेत. विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांमध्ये पूर्णपणे संरक्षित अनेक प्राचीन भांडी मिळाली आहेत. या भांडय़ांमध्ये सुमारे 1300 वर्षे जुनी सामग्री प्राप्त झाली आहे.
वेगवेगळय़ा भूमध्यीय भागांमधील सामग्रीने भरलेले हे जहाज होते. 7 व्या शतकात पाश्चिमात्य देशांमधून लोक व्यापारासाठी या ठिकाणी ये-जा करत होते याचा पुरावा म्हणजे हे जहाज असल्याचे शोधकर्त्यांनी म्हटले आहे. जहाज बुडण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे जहाज पूर्व भूमध्यीय भागांमधून ख्रिश्चियन बीजान्टिन साम्राज्याचा अस्त होत असतानाचे हे जहाज असल्याचे सांगण्यात आले आहे. हे जहाज 7 व्या किंवा 8 व्या शतकातील असेल. धार्मिक संघर्षानंतरही या भूमध्यीय क्षेत्रात व्यापार सुरू होता हे या जहाजामुळे स्पष्ट होत असल्याचे सागरी पुरातत्व तज्ञ डेबोरा सिविकेल यांनी म्हटले आहे.

समुद्रात मिळालेले हे जहाज प्रत्यक्षात 25 मीटर लांबीचे असेल. जहाजातून मिळालेल्या कलाकृती पाहता हे जहाज इजिप्तच्या सायप्रसमधून आले असेल किंवा ते तुर्कियेचे असावे. उत्तर आफ्रिकन किनाऱयावरून हे जहाज येथे पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
इस्रायलमधील समुद्र किनारा कित्येक शतकांपासून बुडालेल्या जहाजांनी भरलेला आहे. येथे असलेल्या अवशेषांबद्दल माहिती मिळविणे तुलनेत सोपे आहे कारण या भागात पाण्याची पातळी कमी असते आणि वाळवंटी पृष्ठभागामुळे कलाकृती सुरक्षित राहतात.
तर जहाजात शोधकर्त्यांना 200 भांडी मिळाली आहेत. यात भूमध्यीय भागांमधील खाद्यसामग्री म्हणजेच माशाची चटणी आणि वेगवेगळय़ा प्रकारची दंतपावडर, खजूर अन् अंजीर मिळाले आहेत.









