सणासुदीच्या अगोदरच किमती 1000 रुपयांनी वाढविल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरोमोटो कॉर्पने गुरुवारपासून आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरच्या किमती 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. भारतात सणांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कंपनीने मोठे पाऊल उचलले आहे. मंदीचा प्रभाव टाळण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
हिरो मोटोकॉर्प काय म्हणाले?
कंपनीच्या एका अधिकाऱयाने सांगितले की, महागाईचा प्रभाव टाळण्यासाठी वाहनांच्या किमती वाढवल्या जाणार आहेत. यायोगे कंपनीवरचा भार काहीसा कमी केला जाणार आहे. सर्व दुचाकींच्या किमती 1,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. वाहनांचे मॉडेल आणि बाजारपेठेनुसार किंमतीत नेमका बदल होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिंदुस्थान पेट्रोलियमसोबत भागीदारी
हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच इलेक्ट्रिक चार्जिंग पेंदे उभारण्यासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमसोबत भागीदारी केली आहे. हिरोमोटो कॉर्प टेक्नॉलॉजीसंबंधात तर एचपीसीएल निधी आणि विक्रीवर काम करणार आहे. या ईव्हीचे चार्जिंग ऑपरेशन पूर्णपणे कॅशलेस मॉडेलवर काम करेल.
विविध मॉडेल्सची विक्री
भारतात हिरोमोटो 14 मॉडेल्सच्या मोटरसायकल आणि 4 मॉडेल्स स्कूटर यांची विक्री करत आहे. मोटरसायकल श्रेणीत एचएफ 100 बाइक्सची श्रेणी एचएफ 100 ची किंमत 51,450 रुपये तर एक्सप्लस 200 4 व्हिची 1.32 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) किमत आहे.









