Raju Srivastav : स्टॅंडअप काॅमेडियन विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले ४२ दिवस त्यांच्यावर एम्स रूग्णालय दिल्ली येथे उपचार सुरु होते. एक विनोदी अभिनेता गमावल्याने चाहते वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
राजू श्रीवास्तव यांच्यावर ४२ दिवसांपासून उपचार सुरू
राजू श्रीवास्तव यांच्यावर गेले ४२ दिवसांपासून उपचार सुरू होते. या ४२ दिवसात त्यांना एकदाही शुध्दी आली नाही. राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही सर्वजण प्रार्थना करा, असे आवाहन राजू यांची मुलगी अंतरा हीने चाहत्यांना केले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
नेमकं काय घडले
जिममध्ये व्यायाम करत असताना १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ट्रेडमिलवर चालत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. आणि जीममध्येच ते कोसळून पडले. त्यांना दिल्लीत एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गेले ४२ दिवस उपचार सुरु होते. या दरम्यान त्यांना एकदाही शुध्द आली नाही. काल राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात १०० टक्के ब्लॉकेज आढळून आले होते. आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Previous Articleनुवे, श्रीस्थळच्या बेपत्ता युवकाचा मृतदेह नदीत सापडला
Next Article भटवाडी-नानोडा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात चोरी









