शोमधून अनेक खुलासे होणार
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा स्वतःची बहिण अमृतासोबत ओटीटीवर दिसून येणार आहे. या दोन्ही लवकरच एक शो सादर करणार असून याचे नाव अरोरा सिस्टर्स आहे. मलायकाने या शोमध्ये स्वतःचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि प्रियकर अर्जुन कपूरला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे.
मलायका या शोमध्ये अरबाज अन् अर्जुन सोबतच्या स्वतःच्या नात्याबद्दल बोलणार आहे. अरबाज अन् अर्जुन हे शोमध्ये एकत्र दिसून येणार नाहीत. दोघांचेही एपिसोड्स वेगवेगळे असतील. या शोद्वारे चाहत्यांना मलायका अन् अमृताच्या आयुष्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.

शोच्या माध्यमातून मलायका अन् अमृता स्वतःच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देणार आहे. शोमध्ये दोन्ही बहिणींचे कुटुंबीय तसेच जवळचा मित्रपरिवार देखील सहभागी होणार आहे.
अरबाज अन् मलायका यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही लवकरच विवाह करणार असल्याचीही चर्चा आहे. मलायकाने वयाच्या 20 व्या वर्षीच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ‘दिल से’ या चित्रपटातील ‘छैंया छैंया’ या गाण्यातील नृत्यामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.









