कॅन्टोन्मेंट स्वच्छता कामगारांचा बेजबाबदारपणा चव्हाटय़ावर
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प परिसरात गेल्या महिन्याभरापासून कचऱयाचा ढिगारा साचला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र या कचऱयाची उचल करण्याकडे कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. पण कचऱयाच्या ढिगाऱया शेजारी असलेल्या हॉटेलमधील कचऱयाची उचल नियमितपणे केली जात आहे. कॅन्टोन्मेंट स्वच्छता कर्मचाऱयांच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंटच्या कर्मचाऱयांकडून स्वच्छतेचे काम वेळेवर आणि व्यवस्थित केले जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. अशातच कॅम्प परिसरातील हॉटेल शेजारी साचलेल्या कचऱयाची उचल करण्याकडे स्वच्छता कामगारांनी कानाडोळा केला आहे. साचलेल्या कचऱयामुळे दुर्गंधी पसरत आहे. हॉटेलचालकांकडून स्वच्छता कामगारांना कचऱयाची उचल करण्यासाठी पैसे दिले जातात. त्यामुळेच हा कचरा उचलला जातो. पण रस्त्याशेजारील कचरा उचल करण्यात टाळाटाळ स्वच्छता कामगारांकडून टाळाटाळ केली जाते.









