मसाला बनवताना घडला प्रकार
चिपळूण : इलेक्ट्रीक ग्रेव्ही मशिनवर मसाला बनवत असताना अचानक शॉक लागून एका हॉटेल कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8.35 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद परशुराम शिंदे (29, गोपाळकृष्णवाडी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबतची खबर रविकांत शंकर गायकर (46, परशुराम नगर, चिपळूण) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद शिंदे हा चिपळुणातील सद्गुरु हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून चार वर्षापासून कामाला होता. तो हॉटेलच्या शेडमधील इलेक्ट्रील ग्रेव्ही मशिनवर हॉटेलच्या किचनमध्ये लागणारा मसाला बनवत होता. यावेळी त्याला अचानक शॉक लागल्याने तो बेशुध्द पडला. त्याला उपचारासाठी तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.









