75 पट झाला सबस्क्राइब ः दमदार लिस्टींगसाठी सज्ज
वृत्तसंस्था / मुंबई
हर्षा इंजिनियर्सचा आयपीओ हा 2022 मध्ये सर्वाधिक सबस्क्राइब होणारा ठरला आहे. सदरचा आयपीओ 75 पट सबस्क्राइब झाला आहे. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेडला गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. याआधी 2022 मध्ये ड्रिमफोक्स सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ सर्वात जास्त सबस्क्राइब झाला होता. सदरचा आयपीओ त्यावेळी 56 पट भरला होता.

जबरदस्त प्रतिसाद
हर्षा इंजिनियर्सच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला आहे. इशुपैकी 50 टक्के इतका वाटा हा पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला असून हा 178 पट भरला आहे तर 35 टक्के वाटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी असून तो 71 पट भरला आहे. 15 टक्के वाटा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असणार आहे, जो 17 पट भरला आहे.
समभाग प्रिमीयमसह होणार दाखल
हर्षा इंजिनियर्सच्या आयपीओला तिसऱया दिवशी गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहता समभाग बाजारात प्रिमीयमसह लिस्टींग होणार असल्याचे संकेत आहेत. गे मार्केटच्या अंदाजानुसार 330 प्राइस बँडच्या तुलनेत लिस्टींग 565 रुपयांसह होण्याची शक्यता आहे.
पाहुया कोणत्या आयपीओला कसा प्रतिसाद मिळाला ते
हर्षा इंजिनियर्स …….. 74.69 पट
ड्रिमफोक्स सर्व्हिसेस . 56.68 पट
कॅम्पस ऍक्टीव्हवेअर .. 51.75 पट
सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी 32.61 पट
अदानी विल्मर लिमिटेड 17.37 पट
व्हीनस पाइप्स अँड टय़ुब्ज 16.31 पट
रेनबो चिल्ड्रन्स मेडीकेअर 12.43 पट









