प्रतिनिधी/ बेळगाव
श्री विश्वकर्मा पांचाळ मनु-मन संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱया दिवशी शनिवारी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शवली.
विश्वकर्मा पांचाळ मनु-मय संस्थेच्या पदाधिकाऱयांनी आणि सदस्यांनी त्यांचे स्वागत करून शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. प्रशासकीय पातळीवर समाजाच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी किरण जाधव यांनी पदाधिकाऱयांशी बोलताना दिली. याप्रसंगी कर्नाटक राज्य विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष बाबू पत्तार, संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर, महिला विभागाच्या अध्यक्षा सुतार यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









