सियोल
दक्षिण कोरियातील संगणक चिप आणि स्मार्टफोन बनवणारी सर्वात मोठी कंपनी सॅमसंग यांनी वर्ष 2050 पर्यंत जीवाश्म इंधनाचा वापर थांबवून 100 टक्के स्वच्छ ऊर्जा वापरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पवन आणि सौर उर्जेसारख्या स्त्राsतांकडून 100 टक्के वीज मिळविण्यासाठी ‘आरई 100’ उपक्रमात सामील झालेल्या शंभर जागतिक कंपन्यांमध्ये सॅमसंग ही सर्वात मोठी ऊर्जा ग्राहक आहे.
कंपनीने आपले ध्येय जाहीर केले. त्यामध्ये, ते 2030 पर्यंत आपल्या मोबाइल डिव्हाइस, डिस्प्ले पॅनेल आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स विभागांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करू इच्छित आहे. वर्ष 2050 पर्यंत अर्धसंवाहकांसह सर्व जागतिक ऑपरेशन्समध्ये केवळ स्वच्छ ऊर्जा वापरण्याचा मानस आहे. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करणे, इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करणे आणि इतर उपक्रमांवर पाच अब्ज डॉलर्स गुंतवले जाणार आहेत.









