हटविण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष : तातडीने दखल घेण्याची मागणी
प्रतिनिधी / येळ्ळूर
झाडे कोसळून अनेकांचा जीव जात आहे. मंगळवारी आरटीओ सर्कलजवळ झाड कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. तेव्हा धोकादायक झाडे हटविणे महत्त्वाचे आहे. येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी नाल्याला लागूनच जुनाट झाड वाळलेले आहे. ते कधी कोसळेल याची शाश्वती नाही. मात्र, ते हटविण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा तातडीने ते झाड हटवावे, अशी मागणी होत आहे.
सदर झाड हटविण्यासाठी अनेकवेळा विनंती करण्यात आली आहे. मात्र, या झाडाने जीव घेतल्यानंतरच ते हटविणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. येळ्ळूर रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. दीड-दोन महिन्यांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन-तीन तरुण जखमी झाले. अशा घटना वारंवार घडत असताना या रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे तसेच झुडपे आणि गवत हटविण्याकडे दुर्लक्ष होत
आहे.
रस्ता डांबरीकरणाची मागणी
सध्या शेतकरी रस्त्याच्या बाजूने असलेले गवत कापत आहेत. मात्र, जी धोकादायक झाडे व झुडपे आहेत तीदेखील हटविणे महत्त्वाचे आहे. हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्यावरून वाहन बाजूला घेणे म्हणजे अपघाताला आमंत्रण आहे. पावसाळय़ात तर नक्कीच अपघात घडू शकतो. तेव्हा आता या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भर टाकावी, अशी मागणी होत
आहे.
मातीचे ढीग हटविण्याची गरज
या रस्त्यावर अनेक ठिकाणी मातीचे तसेच कचऱयाचे ढीग आहेत. तेदेखील हटविणे महत्त्वाचे आहे. येळ्ळूर पेट्रोल पंपाजवळ रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहने घसरून पडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. या रस्त्यावरून विटा, वाळूसह इतर अवजड वाहनांची वाहतूक होत असते. देसूर, सुळगा, खानापूर या परिसरातूनही वाहनांची वाहतूक अधिक आहे. तेव्हा या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.









