दहिवडीतील गावगुंडांचे खंडण करण्याची गरज
दहिवडी प्रतिनिधी
दहिवडी ( ता. माण ) येथील फलटण दहिवडी रोडवर शबनम ढाब्यावरती जुन्या वादातून दोन गटातील युवकांमध्ये जोरदार हाणामारी सुरु असताना भांडण सोडविण्यास गेलेल्या तेजस गलंडे याच्या डोक्यात बियरची बाटली मारून रक्तबंबाळ करून खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये तेजस रक्ताच्या थारोळ्यात पडला.
तेजस गलंडे यांनी दहिवडी पोलीस ठाणेत दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की दहिवडी हद्दीत असलेल्या भवानवाडी येथील भवानी माता देवीची वार्षिक यात्रा पंधरा दिवसापूर्वी पार पाडली त्या यात्रेत माझा मित्र प्रथमेश शिवाजी जाधव राहणार भवानवाडी( दहिवडी ) याचा तेथीलच हर्षद शामराव नाळे याच्याशी काही कारणास्तव शाब्दिक वाद झाला होता. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी व माझा मित्र प्रथमेश जाधव शबनम ढाबा येथे गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तेथे विनोद परशुराम नाळे, हर्षद शामराव नाळे, जयसिंग शिवराम नाळे, तुषार बबन नाळे, निलेश दशरथ नाळे,रवी बाळू शिंगाडे, सर्वजण राहणार भवानवाडी (दहिवडी ) हे तीन मोटारसायकलवरून सहाजण तिथे आले.व माझा मित्र प्रथमेश शिवाजी जाधव याला लाथा बुक्क्यानी मारहाण करू लागले. सदरचे भांडण सोडविण्यासाठी मी गेलो असता मला रवी बाळू शिंगाडे याने रस्त्याच्या बाजूला पडलेली बियरची बाटली माझ्या डोक्यात फोडून रक्तबंबाळ केले. त्यावेळी मी उजवा हात कपाळासमोर धरला त्यावेळी उजव्या हातावर जोरदार वार झाला.
त्यानंतर हर्षद शामराव नाळे याने त्याच्या हातातील बेल्टने प्रथमेश याला जोरदार मारहाण केल्याने प्रथमेश च्या उजव्या डोळ्याच्या खाली जोरदार जखम झाल्याने तेथून रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. त्यानंतर मोटारसायकलवरून निघालेल्या समीर जाधव यांच्या गाडीवरून आम्ही दहिवडी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करून दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास गेलो सदर घटनेची दहिवडी पोलिसांनी चौकशी करून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.या अगोदर देखील दहिवडी परसरामध्ये अशा जोरदार हाणामारी झाले आहेत. काहींनी पोलीस स्टेशन न जाता आपापसात मिटवले आहेत. असे वाद-विवाद नियमित जर होत राहिले तर अशा गुंडगिरीचे खंडन करण्याची गरज आहे. अशा गुंड प्रवृत्तींना कडक शिक्षा करून वठणीवर आणले पाहिजे..









