प्रतिनिधी /वाळपई
मंगळवारी संध्या. 7 वाजण्याच्या सुमारास ठाणे हिवरे रस्त्यावर झाड पडल्याचा प्रकार घडला. वाळपई अग्निशामक देशांमध्ये दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन सदर झाड दूर केल्यामुळे रस्ता मोकळा झाला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
मंगळवारी संध्याकाळी 7 वा. सुमारास रस्त्यावर काजूचे झाड पडण्याची घटना घडली. याची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाचे हवालदार डी .जे. गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आदम खान, प्रदीप गावकर, रुपेश गावकर यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सदर झाड दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
ठाणे भागातून हिवरे हा जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता आहे .हा रस्ता पूर्णपणे घनदाट जंगलातून जात असल्यामुळे सदर झाड पडून कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अग्निशामक दलाच्या यंत्रणेने चांगल्या प्रकारचे सहकार्य केल्याची माहिती हिवरे भागातील नागरिकांना दिली.









