भोगावती / प्रतिनिधी
नंदवाळ ता करवीर येथील परिसरात बुधवारी सकाळी बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. सकाळी वैरणीसाठी गेलेले येथील शेतकरी व जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या लोकांना जगताप मळा परिसरात हा प्राणी नजरेस पडला आहे. कोल्हापूर ते भोगावती मार्गावरील वाशी व नंदवाळच्या मध्यभागी हा मळा असल्याचे सांगण्यात आले.नंदवाळ ग्रामस्थांकडून माहिती मिळताच काही वेळापूर्वीच वनखात्याचे पथक तपासासाठी परिसरात दाखल झाले आहे.
Previous Articleयावर्षी शाळांना 14 दिवस दसरा सुटी
Next Article अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिरामध्ये गर्दी









