गांधी चौक ते गणपती मंदिरपर्यंतच्या बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याची अवस्था
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राज्य मार्गांची देखभाल केली जाते. मात्र, मागीलवषी देखभाल करण्याचे कंत्राट काढले नसल्याने रस्त्याशेजारील झाडे-झुडूपे हटविण्यासह पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग करण्यात आलेला नाही. परिणामी, पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असून गांधी चौक ते गणपती मंदिरपर्यंतचा अरगन तलावाशेजारील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
पावसाळय़ापूर्वी राज्य मार्गाशेजारील झाडे-झुडूपे हटवून स्वच्छ केले जाते. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग निर्माण केला जातो. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत नाही. तसेच रस्तादेखील खराब होत नाही. पण सार्वजनिक बांधकाम खात्याने याकरिता कोणतीच दखल घेतली नसल्याने बेळगाव-वेंगुर्ला मार्गाशेजारील झाडे-झुडूपे वाढली आहेत. परिणामी, अपघात होण्याची दाट शक्मयता आहे.
विशेषतः जयनगर परिसरात असलेल्या पेट्रोलपंप समोर हा धोका अधिक आहे. गांधी चौकापासून गणपती मंदिरपर्यंतच्या रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग केलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आहे. रस्त्याशेजारी गटारी असूनही पाणी रस्त्यावरून वाहते. परिणामी, संपूर्ण रस्ता वाहून गेला असून मागील वषी केलेल्या रस्त्याची वाताहत झाली आहे.
ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिसरात पथदीप नसल्याने अंधार पसरलेला आहे. या अंधारातून मार्ग काढताना वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर अशाप्रकारे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच रामघाट रोडवरही अशीच अवस्था झाली असून शौर्य चौक ते राकसकोपपर्यंतच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत आहे. वास्तविक पाहता पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने पावसाळय़ाच्या सुरुवातीस खबरदारी घेणे आवश्यक होते. पण अधिकाऱयांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आता हे खड्डे वाहनधारकांना धोकादायक बनले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांनी याची पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









