Close Menu
Tarun Bharat
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    Trending
    • Testing
    • Test 5 Dec
    • Test Post 12-11
    • Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
    • उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
    • Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
    • Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
    • आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    Tarun Bharat
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी! YEARLY NEWSPAPER SUBSCRIPTION E-paper
    • होम
    • महाराष्ट्र
      • मुंबई /पुणे
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सातारा
      • सोलापूर
      • कोकण
      • इतर
    • कर्नाटक
      • बेंगळूर
      • बेळगांव
      • हुबळी / धारवाड
      • कारवार
      • विजापूर
    • गोवा
    • भविष्य
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • क्रीडा
    • संपादकीय
    • व्यापार / उद्योगधंदे
    • मनोरंजन
    • इतर
      • टेक / गॅजेट
      • फूड
      • ऑटोमोबाईल
      • विविधा
      • संवाद
      • कृषी
      • व्यंगचित्रे
      • फॅशन
      • विनोद
      • अस्मिता
      • नोकरी / करियर
      • टुरिझम
      • आरोग्य
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp Telegram
    दिवाळी मासिक थेट तुमच्या घरी!
    Tarun Bharat
    बेळगांव

    ‘अगं अगं म्हशी…लॉकअपमध्ये नेशी!’

    Tarun Bharat PortalBy Tarun Bharat PortalSeptember 13, 20222 Mins Read

    दागिने चोरणाऱयांनी म्हशीही चोरल्या, पाच जणांना अटक, सात लाखांचा ऐवज जप्त

    प्रतिनिधी /बेळगाव

    महिलांच्या गळय़ातील दागिने चोरणाऱया चोरटय़ांनीच गोठय़ातील म्हशीही चोरल्याचे उघडकीस आले आहे. हारुगेरी (ता. रायबाग) पोलिसांनी अल्पवयीन मुलासह पाच जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याजवळून सात लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

    जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. केवळ हारुगेरीच नव्हे तर मुगळखोड, तेरदाळ परिसरातही या टोळीने चोऱया केल्याचे उघडकीस आले आहे. महिलांच्या गळय़ातील दागिने पळविण्यात हे गुन्हेगार तरबेज होते. पोलिसांनी त्यांच्या मुसक्मया आवळल्या आहेत.

    अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी, उपनिरीक्षक आर. आर. कंगनोळी, आर. एस. खोत, कुमार पवार, राजू कटगेरी, अशोक सांडगे, बसवराज होसट्टी, हणमंत अंबी, जी. एन. कागवाड, प्रकाश सप्तसागर, सागर कांबळे, रमेश केत्री व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कण्णावर आदींनी ही कारवाई केली आहे.

    अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हारुगेरी, मुगळखोड, तेरदाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात या टोळीतील गुन्हेगारांनी महिलांच्या गळय़ातील दागिने पळविले आहेत. हारुगेरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून गोठय़ातील पाच म्हशीही त्यांनी चोरल्या होत्या. यापैकी दोन म्हशींची विक्री करण्यात आली होती. तर तीन म्हशी या गुन्हेगारांनी आपल्या गोठय़ात बांधल्या होत्या.

    पोलिसांनी 5 चोरी प्रकरणात 49.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन म्हशी, गुह्यासाठी वापरलेली एक मोटारसायकल, एक मिनी गुड्स वाहन असा एकूण 6 लाख 94 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. सध्या गुन्हेगारांनी आपल्या गोठय़ात बांधलेल्या तीन म्हशी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. चोरटय़ांनी त्यांनी विक्री केलेल्या दोन म्हशींचाही शोध घेण्यात येत आहे.

    #tarunbharat_official #tarunbharatnews #tarunbharatSocialMedia
    Previous Articleमोटारसायकली चोरणाऱया तरुणाला अटक
    Next Article विद्युत विभागाचे खासगीकरण करू नये
    Tarun Bharat Portal

    Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.

    Related Posts