द फॅबेलमॅन्स लवकरच होणार प्रदर्शित
ज्युरासिक पार्क, लिंकन, म्यूनिख, वेस्ट साइड स्टोरी आणि टिन-टिन यासारखे उत्तम चित्रपट निर्माण केलेले दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांची आता सेमी ऑटोबायोग्राफी ‘द फॅबमॅन्स’ येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्टीव्हन स्पीलबर्ग यांचे कुटुंब आणि त्यांच्या जीवनाशी निगडित कहाणी यातून व्यक्त होते.

द फॅबेलमॅन्सचा प्रीमियर शनिवारी टोरंटो चित्रपट महोत्सवात पार पडला असून तेथे या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. द फॅबेलमॅन्ससोबत स्पीलबर्ग पहिल्यांदाच टोरंटो चित्रपट महोत्सवात सामील झाले. माझ्या जीवनातील 75 वर्षांचे अनुभव या चित्रपटात उतरविण्यात आल्याचे स्पीलबर्ग यांनी म्हटले आहे.
स्पीलबर्ग यांचा हा चित्रपट त्यांच्या ऍरिझोनामधील प्रारंभिक वर्षांवर आधारित आहे. पटकथालेखक टोनी कुशनर यांच्यासोबत त्यांनी याची कहाणी लिहिली आहे. या चित्रपटात मिशेल विलियम्स, पॉल डानो, गेब्रियल लाबेले, सेठ रोजन, जेनी बर्लिन, ज्युलिया बटर, रॉबिन बार्टलेंट, कीली कार्स्टन आणि जुड हिर्श हे कलाकार दिसून येतील. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क अन् लॉस एंजिलिस या शहरांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.









