वार्ताहर/ उचगाव
सुळगा (हिं.) येथील कन्या आणि महिला विद्यालय मराठी माध्यम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया भोगाण्णा पोटे ही बेंगळूर येथे सुरू असलेल्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे वेंगुर्ला रोड येथील गणेशोत्सव मंडळातर्फे तिचा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मल्लाप्पा पाटील, भोमाण्णा पोटे आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आर. एम. चौगुले म्हणाले, यापुढे ग्रामीण भागामध्ये क्रिकेट हा खेळसुद्धा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. महिलासुद्धा या खेळामध्ये आपली चमक दाखवू शकतात हे तिने सिद्ध करून दाखवले आहे. 19 वर्षाखालील स्पर्धेमध्ये तिने नावीन्यपूर्ण यश मिळवलेले आहे. तिला प्रोत्साहित करण्याची आज खूप गरज आहे. तिने ग्रामीण भागासह आपल्या बेळगाव जिल्हय़ाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









