Pune Crime : पुण्यात पिंपरी येथील एका सात वर्षीय मुलाचा खून करण्यात आला आहे. त्याचा मृतदेह भोसरी औद्योगिक वासाहितीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर सापडला आहे. आदित्य गजानन ओगले ( मसुलकर कॉलनी, पिंपरी) असे त्य़ाचे नाव आहे. खंडणीतून त्य़ाचा खून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
आदित्यचे वडील गजानन ओगले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा आदित्य हा गुरुवारी सायंकाळी खेळायला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो परत आला नाही. तो बराच वेळ होऊनही घरात परत आला नसल्याने त्याच्या वडीलांनी पिंपरी पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान, ओगले यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्याने २० कोटी रुपयांची खंडणी मागितली. ती न दिल्याने या चिमुकल्याला संशियीताने आदित्यला ठार मारले. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी एका मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता मुलाचा खून झाला असल्याचे कळले. शुक्रवारी आदित्य याचा मृतदेह भोसरी औद्योगिक वासाहितीतील एका पडक्या इमारतीच्या टेरेसवर आढळला.
Previous Articleपोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक लांबली
Next Article गॅस टँकर पलटी चालकाचे दोन्ही हात निकामी









