दुबई / वृत्तसंस्था
वणिंदू हसरंगा, तिक्षणा व मदुशन यांची भेदक गोलंदाजी आणि पथूम निस्सांकाच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील शेवटच्या सुपर-4 लढतीत पाकिस्तानचा 5 गडी राखून सहज फडशा पाडला आणि आगामी फायनलची जणू ड्रेस रिहर्सल जिंकली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पाकिस्तानचा डाव 19.1 षटकात सर्वबाद 121 धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात लंकेने 17 षटकात 5 बाद 124 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला. निस्सांकाने 48 चेंडूत नाबाद 55 धावांचे योगदान दिले. उद्या (रविवार दि. 11) पाकिस्तान-लंका याच दोन संघात जेतेपदासाठी निर्णायक फायनल रंगणार आहे.
श्रीलंकेने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलामीवीर मोहम्मद रिझवान अवघ्या 14 धावांवर बाद झाला तर तिसऱया स्थानावरील फखर झमानला देखील 13 धावांवरच परतावे लागले. बाबर आझम तिसऱया गडय़ाच्या रुपाने परतला. त्यानंतर खुशदिल शाह (4), असिफ अली (0), हसन अली (0), उस्मान कादीर (3), हॅरिस रौफ (1) ठरावीक अंतराने बाद होत राहिले. डावखुऱया नवाझने 18 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह जलद 26 धावा फटकावल्या. मात्र, तोही मोक्याच्या क्षणी बाद झाला. हॅरिस रौफ एका धावेवर बाद झाल्यानंतर तिथेच पाकिस्तानचा डाव 19.1 षटकात सर्वबाद 121 धावांवर गुंडाळला गेला.
धावफलक
पाकिस्तान ः मोहम्मद रिझवान झे. मेंडिस, गो. लियानगमगे 14 (14 चेंडू), बाबर आझम त्रि. गो. हसरंगा 30 (29 चेंडूत 2 चौकार), फखर झमान झे. हसरंगा, गो. करुणारत्ने 13 (18 चेंडूत 1 चौकार), इफ्तिकार अहमद त्रि. गो. डीसिल्व्हा 13 (17 चेंडूत 1 चौकार), खुशदिल शाह झे. निसांका, गो. धनंजया 4 (8 चेंडू), मोहम्मद नवाझ धावचीत (हसरंगा-मेंडिस) 26 (18 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), असिफ अली त्रि. गो. धनंजया 0 (1 चेंडू), हसन अली झे. धनंजया, गो. तिक्षणा 0 (2 चेंडू), उस्मान कादीर झे. निसांका, गो. तिक्षणा 3 (6 चेंडू), हॅरिस रौफ झे. धनंजया, गो. लियानगमगे 1 (2 चेंडू), मोहम्मद हसनैन नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 17. एकूण 19.1 षटकात सर्वबाद 121.
गडी बाद होण्याचा क्रम
1-28 (रिझवान, 3.3), 2-63 (झमान, 9.2), 3-68 (बाबर आझम, 10.4), 4-82 (खुशदिल, 13.3), 5-91 (इफ्तिकार, 14.5), 6-91 (असिफ अली, 14.6), 7-95 (हसन अली, 15.6), 8-110 (उस्मान, 17.5), 9-121 (नवाझ, 18.5), 10-121 (रौफ, 19.1).
गोलंदाजी
दिलशान मदुशनाका 4-0-35-0, महिश तिक्षणा 4-0-21-2, प्रमोद मदुशन 2.1-0-21-2, धनंजया डीसिल्व्हा 4-0-18-1, वणिंदू हसरंगा 4-0-21-3, चमिंगा करुणारत्ने 1-0-4-1.









