राष्ट्रीय नेते कीर्ती आझाद यांच्याकडून घोषणा : गोवा राज्य समितीची संपूर्ण पुनर्रचना जाहीर खासदार लुईझिन फालेरो यांना स्थान नाही
प्रतिनिधी /पणजी
तृणमूल काँग्रस (टिएमसी) पक्षाने गोवा राज्य समितीची पुनर्रचना केली असून पक्षाचे खासदार लुईझिन फालेरो यांना त्यात स्थान देण्यात आले नाही. पक्षाचे नेते समील वळवईकर यांना संयुक्त निमंत्रक म्हणून नेमण्यात आले असून पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र काकोडकर यांना उत्तर गोव्याचे तर समाजिक कार्यकर्ते जॉर्सन फर्नांडिस यांना दक्षिण गोव्याचे अध्यक्षपद देण्यात आहे.
पक्षाचे प्रवक्ते कीर्ती आझाद यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवीन पुनर्रचित समितीची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सर्व स्तरातील लोकांना आणि प्राधान्याने युवकांना, महिलांना नवीन समितीत स्थान देण्यात आले आहे. समितीमध्ये एकूण 40 जणांची नावे समाविष्ट असून गरज पडल्यास आणि काही जणांचा त्यात समावेश करण्यात येणार आहे.
लोकसभा, विधानसभेवर लक्ष ठेवून समिती
येणाऱया 2024 मधील लोकसभा आणि गोव्यातील 2027ची विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून सदर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत 33 टक्के महिलांना स्थान देण्यात आले असून दोन्ही निवडणुकांची तयारी करण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या मान्यतेने ही समिती जाहीर करण्यात आल्याचे आझाद यांनी नमूद केले.
सह अध्यक्ष दक्षिण गोवा – शिवदास नाईक, उत्तर गोवा – कांता गावडे, सरचिटणीस – अविता बांदोडकर, प्रतिभा बोरकर, मारियो पिंटो, गांधी हेनरिक्स, राखी नाईक, व्हिक्टर गोल्साल्वीस, सचिन घोटगे, केनेडी आफोन्सो, दशरथ मांद्रेकर व शीतल गुंजीकर.
युवा समिती – समन्वयक – अँनी पिक्सेटो, सदस्य – नवदीप फळदेसाई, राहूल शटय़े व ज्योकिम फर्नांडिस. संपर्क समिती – समन्वयक – ट्रोजन डिमेलो, सदस्य – जयेश शेटगावकर, पीटर आफोन्सो, ऍना ग्रासियस. आयटी समन्वयक – तनोज अडवलपालकर, अल्पसंख्याक समन्वयक – सुल्ताना शेख, विन्सेन्ट फर्नाडिस, सदस्य – सांतान डायस, अप्सरा खान, एसटी व एससी समन्वयक – संतोष शंकर मांद्रेकर, ओबीसी समन्वयक – आनंद नाईक, सदस्यत्व मोहीम निमंत्रक – सिद्धेश्वर मिश्रा, सदस्य – डॉ. नविदा हबीब.









