सर्वसामान्य जनतेचा प्रश्न, अनेक शाळांजवळ गतिरोधक नसल्याने धोका : मागील दोन वर्षात अपघातांची संख्या वाढली
प्रतिनिधी /बेळगाव
कोणताही अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम, पोलीस खात्याला जाग येते. त्यानंतर गतिरोधक बसविले जातात. कॅम्पमध्ये अपघात घडल्यानंतर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र इतर बऱयाच ठिकाणी बसविलेले गतिरोधकही खराब झाले आहेत. त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघात घडल्यानंतरच गतिरोधक बसविणार काय? तसेच त्यांची दुरुस्ती करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर खराब झालेल्या गतिरोधकांची दुरुस्ती कधी करणार, हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था व वाहनांना शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलिसांची भूमिका मोलाची असते. मात्र मागील दोन ते तीन वर्षांतील अपघातांची संख्या पाहता यासाठी काय करता येईल, याची दक्षता घेणे गरजेचे वाटते. शहराचा पसारा वाढतो आहे. तशा अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. धूम स्टाईलला अडसर म्हणून गतीरोधकांची निर्मिती केली आहे. मात्र सर्वच गतिरोधकांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. याकडे लक्ष कोण देणार? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, गतिरोधकांची झालेली अवस्था सुधारावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
रस्त्यावर लोखंडी खिळे पडल्याने वाहने पंक्चर
कित्तूर चन्नम्मा चौक ते आरटीओपर्यंत गतिरोधक बसविण्यात आले होते. ते गतिरोधक रबरी होते. मात्र त्यामधील काही भाग तुटून गेला आहे. त्यामुळे गतिरोधक बसविताना वापरण्यात आलेले लोखंडी खिळे उघडय़ावर पडले आहेत. त्यामुळे वाहने पंक्चर होण्याची शक्मयता अधिक आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय परिसरात असणाऱया गतिरोधकांचीही दुरवस्था झाली आहे. वाहतुकीसाठी हा सर्वात महत्त्वाचाच रोड आहे. मात्र त्या रस्त्यावरच योग्य ठिकाणी तसेच योग्य पद्धतीने गतिरोधक नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवा
शहरात अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. केवळ वाहतुकीसंदर्भातील काळजी रहदारी पोलीस व महापालिका घेत नसल्यानेच हे अपघात घडत आहेत. सध्या स्मार्टसिटीची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. बरीच कामे अर्धवट आहेत. स्मार्टसिटी अंतर्गत अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र महापालिका व रहदारी पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
कॉलेज रोडवर विविध महाविद्यालये व शाळा आहेत. या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे. मात्र त्याठिकाणी असलेले गतिरोधकही काढून टाकण्यात आले आहेत. यामुळे वाहने जोरात ये-जा करत असतात. यातून अपघात घडू लागले आहेत. तरी या ठिकाणी शास्त्राrय पद्धतीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
अपघातांमुळे वाहनांचेही नुकसान
शहरात काही ठिकाणी गतिरोधक उंच असल्याने त्याठिकाणी वाहनचालक घसरुन पडू लागले आहेत. याचा वाहनचालक व मागे बसलेल्यांना त्रास होत आहे. वाहनांचेही नुकसान होऊ लागले आहे. बऱयाचवेळा दुचाकीवरून जाताना नियंत्रण सुटून या गतिरोधकावरून पडून अनेकजण जखमी होऊ लागले आहेत. तेंव्हा हे गतिरोधक शास्त्राrय पद्धतीने बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
अशास्त्राrय गतिरोधकांमुळे अपघातांत वाढ
विविध ठिकाणी असलेले अशास्त्राrय पद्धतीचे गतिरोधक तयार करण्यात आल्याने या ठिकाणीही अपघात घडू लागले आहेत. तर काही ठिकाणी गतिरोधक आवश्यक असताना त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले नाहीत. यामुळे नको त्या ठिकाणी सरकारी पैसा वाया घालण्यातच धन्यता मानली जात आहे. दरम्यान ज्या ठिकाणी अपघात घडू लागले आहेत त्या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे असते. मात्र याकडे पाठ फिरवून आपली जबाबदारी संपली म्हणून हात झटकण्यात येत आहेत. यासाठी महापालिका व रहदारी पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम हाती घ्यावी अशी, मागणी जनतेतून होऊ लागली आहे.









