बेळगाव : उचगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सहशिक्षिका छबुताई सिद्राम पाटील यांना 2022-23 सालचा आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच देण्यात आला. 5 सप्टेंबर रोजी साई मंगल कार्यालय खासबाग येथे झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरणावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, तालुका गटशिक्षणाधिकारी जुटण्णावर यांच्यासह अन्य अधिकारी, शिक्षक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.









