किमत 10 हजारपेक्षाही कमी राहणार , 12 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार फोन
नवी दिल्ली
रियलमी जीटी निओ 3 टी या मॉडेलनंतर कंपनीने रियलमी सी 33 मोबाईल बाजारात सादर केला आहे. सदरचा स्मार्टफोन 2 स्टोरेजच्या पर्यायासह आणि 3 रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. सदरचा फोन अगदी बजेटमध्ये उपलब्ध होणार असून याची किंमत जवळपास 8,999रुपये इतकी सुरुवातीची राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये ग्राहकांना 50 मेगापिक्सल 0.3 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोन बाजारात 12 सप्टेंबरच्या दुपारपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
दोन मॉडेलमध्ये मिळणार
कमीत कमी बजेटवाला असणारा हा स्मार्टफोन ग्राहकांना दोन मॉडेलमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
टॉप फिचर्स…
6.5 एचडी डिस्प्ले
5000 एमएएच लिथियम आर्यन बॅटरी
10 वॅट चार्जिंग
यूनिसोक टी 612 प्रोसेसर









