ऑनलाईन टीम/तरुण भारत
नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीआर संस्थेच्या हरियाणा, महाराष्ट्र आणि गुजरातमधील ठिकाणांवर ही कारवाई होत आहे. २० पेक्षा अधिक नोंदणीकृत, मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी आयकर विभाग ही कारवाई करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आयकर विभागाने ही कारवाई केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीदरम्यान ८७ राजकीय पक्षांना आरयुपीपी यादीतून हटवण्यात आले होते. यातील काही पक्षांवरच आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यात आयकर विभागाने छापे टाकले असून नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तसंच, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही छापेमारी करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. आयकर विभागाने दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीआर संस्थेच्या हरियाणा, महाराष्ट्र आणि गुजरातमधील ठिकाणांवर ही कारवाई होत आहे. २० पेक्षा अधिक नोंदणीकृत, मात्र मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी आयकर विभाग ही कारवाई करत आहे.
गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह देशातील अनेक राज्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आयकर विभागाने छत्तीगढमध्ये अनेक व्यावसायिकांवरही छापेमारी केली आहे. तसेच, वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत नसलेले राजकीय पक्ष आणि त्यासंबंधित असलेल्या अनेक संस्था, ऑपरेटरविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे या पक्षांमार्फत सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर निर्बंध घालण्याकरता आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे.