कास, वार्ताहर
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी तब्बल दहा दिवस उशिराने सुरू होत आहे. चालू वर्षीचा हंगाम हा शनिवार दिनांक १० सप्टेंबर पासून सुरू करत असल्याची माहिती कास पठार कार्यकारी समिती तसेच वनविभाग सातारा यांचेकडून देण्यात आली आहे.


मोठी वाहने कास धरणा नजीकच्या पार्किंगमध्ये पार्क करण्यात सोय करण्यात आली आहे. तर छोटी वाहने ही घाटाफाट्या नजीक असणाऱ्या कासानी येथील पार्किंगमध्ये पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे.दोन्ही बाजूकडून पाठारावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतागृह तसेच पिण्यासाठी मिनरल वॉटर ची व्यवस्था करण्यात आली आहे.












