दोन लाख रोख रकमेसह साडेतीन तोळे सोने लंपास
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या असोगा येथे दीवसाढवळय़ा चोरी करून दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेतीन तोळे सोने चोरटय़ांनी लंपास केले आहे.खानापूर शहराजवळ असलेल्या असोगा येथील बाबू शट्टू पाटील यांच्या बंद घरात धाडसी चोरी झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, असोगा येथील बाबू शट्टू पाटील हे आपल्या पत्नीसह खानापूरला बाजारासाठी गेले होते. त्यावेळी बंद घर पाहून चोरटय़ांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मुख्य दरवाजाला आतून कडी लावून घरातील साडेतीन तोळे सोने, दोन लाख दहा हजार रोख असा एकूण चार लाख तेवीस हजाराचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. बाबू पाटील व त्यांची पत्नी जेव्हा खानापूरहून बाजार व इतर कामे आटोपून दुपारी चार वाजता घरी परत आल्यानंतर घरातील दोन्ही कपाटे उघडलेल्या अवस्थेत होती. तसेच कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले पाहताच चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यांनी तात्काळ खानापूर पोलीस स्थानकात याबाबत माहिती दिली.
खानापूर पोलिसांनी आसोगा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहाणी करुन तपास सुरू केलेला आहे. चोरी झालेली दोन्ही खोली पोलिसांनी शील बंद केली असून बुधवारी सकाळी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात येणार आहे. बाबू पाटील यांचा एक मुलगा सैन्यात आहे दुसरा मुलगा बेळगाव येथे नोकरी करतो दुपारी शट्ट पाटील व पत्नी बाजारला गेल्यानंतर घरात कोणी नसल्याचे पाहून दुपारच्या सुमारास ही चोरी करण्यात आली सायंकाळी बाजार व इतर कामे आटपून आल्यानंतर त्यांच्या चोरी झाल्याच निदर्शनास आले बाबू पाटील यांनी झाड शहापूर येथे प्लॉट खरेदी केला आहे. सैन्यात असलेल्या मुलाने ही रक्कम बँकेत पाठवली होती . रक्कम प्लॉट मालकाला देण्यासाठी बँकेतून काढून आणण्यात आलेली होती . ती कपाटात ठेवली होती चोरटय़ानी दोन कपाटे फोडून सामान अस्ताव्यस्त करून रोख रक्कम व सोने घेऊन पलायन केले आहे . आम्ही खानापूर येऊन समोरचे दाराला कुलूप लावून गेले होते ते कुलूप काढून दार उघडण्याचा प्रयत्न केला दार उघडत नव्हते तेव्हा आम्ही मागील दारातून गेलो असता मागीलदार उघडय़ा अवस्थेत असलेले पाहून आत गेलो असता घरातील सामान अस्ताव्यस्त गेले होते पडलेले होते व दोन्ही कपाटे फोडण्यात आलेले होती समोरील दरवाजाला आतून कडी लावण्यात आली होती.असे बाबु पाटील यांनी सांगितले
दिवसाढवळय़ा धाडसी चोरी झाल्याने खानापूर परिसरात व ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. असोगा गावाला लागून असलेल्या माणसापूर येथे आठ दिवसांपुर्वी दीवसा ढवळय़ा चोरी झालेली होती त्यावेळी तीन तोळे सोने व 25000 ची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. महिन्यामागे गर्लगुंजी येथे एकाच रात्री तीन घरफोडय़ा झाल्या होत्या त्यावेळीही पाच डोळे सोने व रोख रक्कम चोरटय़ांनी पळवली होते. तालुक्मयात ग्रामीण भागात वारंवार चोऱया होत आहेत. अद्याप एकाही चोरीचा छडा खानापूर पोलिसांकडून लागलेला नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच होत असलेल्या छोटय़ा-मोठय़ा चोरीची खानापूर पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व खेद व्यक्त होत आहे .









