आईने जन्म देताच मुलांना केले होते दान
जेव्हा लोक कुटुंबापासून दूर राहतात, तेव्हा त्यांना त्यांच्या घराची आठवण सतावू लागते. अशा स्थितीत काही दिवसांनी ते जेव्हा कुटुंबीयांना भेटतात तेव्हा भावुक होतात. अलिकडेच एका व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबाची 77 वर्षांनी भेटला आहे. इंग्लंडच्या एका वृद्ध व्यक्तीची ही कहाणी आहे. हा व्यक्ती जन्मापासूनच कुटुंबापासून दूर गेला होता आणि यामागे त्याची आई जबाबदार होती.
रटलँडमध्ये राहणारे 77 वर्षीय ग्रेग डंडरडेल अलिकडेच 4500 मैल अंतरावरील अमेरिकेच्या कोलोरडोमध्ये स्वतःची पत्नी जिलसोबत पोहोचले. तेथे तो स्वतःच्या दोन भावांना भेटले आहेत. 81 वर्षीय डॅन एलवट आणि 83 वर्षीय प्रँक हे क्रेग यांचे मोठे भाऊ परंतु त्यांना ते पूर्ण 77 वर्षांनी भेटत होते.

पेग यांची आई एलिजा यांना दोन मुले होती. त्यांचे पती सैन्यात होते आणि दुसऱया महायुद्धात सहभागी झाले होते. तेव्हा एलिजा यांचे एका अमेरिकन सैनिकावर पेम जडले. परंतु त्यांचे पती जेव्हा युद्धातून परतले तेव्हा एलिजा या गरोदर होत्या.
एलिजा यांच्या पतीने या अपत्याचा स्वीकार करण्यास नकार दिला. अपत्य जन्मताच त्याला कुणाला तरी दत्तक द्यावे असे त्यांनी सांगितले होते. जन्मानंतर एका नर्सने क्रेग यांना स्वीकारले होते. 1946 मध्ये त्यांना दुसऱया कुटुंबाने दत्तक घेतले होते. त्यांना या नव्या आईवडिलांनी क्रेगला ही पार्श्वभूमी सांगितली होती. क्रेग यांनी 2009 मध्ये एंसेस्ट्री नावाच्या एका वेबसाइटला जॉइन केले. ही वेबसाइट डीएनए टेस्ट करवून जगभरातील लोकांच्या कुटुंबांना जोडते.
सावत्र भावांची भेट
2017 मध्ये क्रेग यांनी डीएनए टेस्ट करवली आणि 2019 मध्ये त्यांना एक मेल मिळाला, ज्यात अमेरिकेतील एक व्यक्ती तुमचा सावत्र भाऊ असल्याचे नमूद होते. क्रेग यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आणि अलिकडेच ते त्यांना भेटले आहेत. त्यांच्या भावांनीही त्यांचे मोठे स्वागत केले आहे.









