पेडणे पोलिसांची कारवाई : ब्रिटिश नागरिकाला अटक
प्रतिनिधी /पेडणे
मधलावाडा हरमल येथे पेडणे पोलिसांनी छापा टाकून साडेपंधरा लाख रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त करत इंग्लंडच्या नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर अमलीपदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोमवारी विश्वसनीय सूञांकडून माहिती मिळाल्यानंतर पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक सुमेधा नाईक, पीसी सचिन हळर्णकर, पीसी सागर खोर्जुवेकर, कृष्णा वेळीप, विनोद शर्मा आणि धनश्री नागवेकर यांची टीम तयार करुन मधलावाडा हरमल येथे छापा टाकण्यात आला. त्यामध्ये एक ब्रिटिश नागरिक स्टिफन स्लॉटविनर (वय 74 वर्षे) पासपोर्ट क्रमांकः 539044270 असलेला नागरिक बेकायदेशीररित्या आढळून आला.
अंमली पदार्थांपैकी 512.2 ग्रॅम वजनाचा गांजा, रु. 51,000/- अंदाजे, 17.7 ग्रॅम वजनाच्या इस्टेसी टॅब्लेट रु. 1,77,000/- अंदाजे आणि एलएसडी पेपर 26 क्रमांक 1.19 ग्रॅम वजनाचे रु. 2,60,000/-, अंदाजे, 80 ग्रॅम वजनाचे एमडीएमए रु. 8,00,000/ अंदाजे आणि एलएसडी 26 नंबरचे रु. 2,60,000, अंदाजे. एकूण रु. 15,48,000/ अंदाजे जे त्याने त्याच्या भाडय़ाच्या जागेत लपवून ठेवले होते. हे सर्व अमलीपदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पेडणे पोलीस उपअधिक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत पुढील तपास करीत आहे.









