प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुक्मयात रविवारी पाच दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन करण्यात आले. भाविकांनी आपल्या परिसरात शेजारी असलेल्या तेरेखोल, शापोरा नदीत, समुद्रात, तलावात, शेत मळय़ातील ओहळात गणपतीचे विसार्जन केले.
पेडणे तालुक्मयातील मोठय़ा संख्येने गणपती हे पाच दिवस असल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणात पाचव्या दिवाशी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पेडणे तालुक्मयात दोन वर्षांनंतर कोरोनाच्या भितीमुळे भाविक आणि गणेश भक्त उत्साही वातावरणात गणेश चतुर्थी उत्सव साजरा करताना दिसले.
सायंकाळी 6 पासून रात्री उशीरा पर्यंत तालुक्मयातील मोरजी, आगरवाडा, हरमल खालचावाडा यासह विविध भागात उत्साही वातावराणात गणेश मूर्तींचे विसर्जन थाटात करण्यात आले.









