फलटण- प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या जीएसटी विभागातील विविध पदाची नोकरी मिळवुन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एका बेरोजगार युवकांने फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीद्वारे नुकताच करण्यात आला असुन या प्रकरणात अनेक बेरोजगार युवकांकडुन लाखो रूपयांची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे या प्रकरणात कोट्यावधीची फसवणुक झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे हे प्रकरण वारंवार दाबले जात असल्याचा आरोपही आर्थिकफसवणुक झालेल्या बेरोजगार युवकांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , नितीश पोपटराव भोसले वय २८ रा . संजीवराजे नगर फलटण नोकरीच्या शोधात असताना राजाळे ता. फलटण येथील मारूती गुलाबराव मोहिते यांनी आपणास नोकरी मिळवुन देण्याचे आमिष दिले होते दरम्यान मोहिते यांनी भोसले यांचे कडुन नोकरीसाठी लागणारी कागदपत्राची मागणी केली रवि अंकुश वणवे ( रा. मलठण ) आणि मारूती मोहिते यांचेकडे भोसले यांनी मलठणमध्ये जाऊन कागदपत्रे दिली असता जीएसटी असिस्टंट पदाची नोकरी मिळणार असल्याची बतावणी भोसले यांना केली. यानंतर तुमच्या कागदपत्र तपासणीसाठी नवी मुंबई येथील वास्ती कार्यालयात जावे लागणार असल्याचे भोसले यांना पुन्हा सांगण्यास आले.
मुळ कागदपत्र तपासणीसाठी नितीश भोसले नवी मुंबई वाशी येथील कार्यालयात भोसले गेले असता त्या ठिकाणी (पंचतारांकीत हॉटेल ) ४०-५० मुले उपस्थित होती. या ठिकाणी रवि वणवे मारूती भोसले, इंद्रजित अनिल पाटील रा . कुडाल पूर ( कवठेमहांळ जि. सांगली ) संदेश लोटलीकर रा. मुंबई असे चौघ जण उपस्थित असल्याचे फिर्यादीने फिर्यादित नमुद केले आहे.
वाशी कार्यालयात मुळ कागदपत्रतपासणीनंतर आपली निवड झाल्याची ऑर्डर संबधीतांना सांगण्यात आले यावेळी उपस्थित प्रत्येकी २५ हजार रूपये रोख स्वरूपात मागितले ऑर्डर मिळणार असल्याने फिर्यादी व इतरांचा विश्वास बसला यानंतर आपणास दिल्लीला ट्रेनिंगसाठी जावे लागेल मात्र रूपये ३० हजार रोख भरावे लागतील अशा सुचना आल्या संबधीत रक्कम लखोट्यात भरावी दोन कोरे चेक सही असणारे या सह लखोटा इंद्रजित पाटील ( सांगली ) व संदेश लोटलीकर ( मुंबई ) यांचेकडे देण्यात यावा असे फोन ०दारे फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना सांगण्यात आले होते ही मागणीही पुर्ण करण्यात आली. यानंतर ट्रेंनिंग ऑर्डर कधी मिळणार अशी विचारणा वारंवार करण्यात येत होती. मात्र पहिली बॅचचे ट्रेनिंग सुरू असुन त्यांनी पैसे भरले असल्याचे संबधीतांना सांगण्यात आले
फलटण येथील माळ जाई मंदिर परिसरात संबधीत गरजुना एकत्र बोलवुन दिल्ली येथे दुसरी बॅंच ( ट्रेनिंग साठी ) पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले खरे मात्र अंबेगांव पुणे येथे अभिनव एज्युकेशन सोसायटी येथे त्यांना पाठविव्यात आले ३० दिवसाचे ट्रेनिंग झाले मात्र जॉयनिंग लेटर अद्यापही मिळाले नसुन या गोष्टीला पाच वर्षाचा कालावधी झाला आहे. कोरोनाच्या काळाचेही भांडवल झाले मात्र नोकरी कुणालाच मिळाली नाही. फसवणुक मात्र ११६ जणांकडुन ४२ लाखाहुन अधिक रक्कमेची झाली असल्याचे फिर्यादी भोसले यांनी फिर्यादीत नमुद केले आहे
दिपक सुरेश मेंगावडे रूई बारामती , अमोल बबनराव तावरे , योगेश नंदकुमार घाडगे ( गोखळी यांच्याबरोबरची अन्य चार मुलांनी १४लाख ७८ रू , सुर्याली सोमनाथ भांडवल कर , जगदीश सोमनाथ भांडवल कर ( रा. मठाचीवाडी ता . फलटण ) ऋतिक शहाजी सस्ते बोडकेवाडी यांचेकडुन २१ लाख५० हजार रुपये घेण्यात आले असुन फलटण शहर व तालुक्यातील काही उच्चभ्रुव्यक्ती करवी बेरोगगारांची फसवणुक झाली असुन याला कोणच दाद देत नाही या प्रकरणात अनेकांची फसवणुक मात्र फसवणुक काणारे सहीसलामत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत