सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ
सोशल मीडियावर अनेकदा धोकादायक अन् अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसुन येते. यातील काही व्हिडिओ पाहून स्वतःच्याच डोळय़ांवर विश्वास बसत नाही. अशाचप्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

विशाल आकाराचे आणि विषारी साप पाहून भल्याभल्यांना घाबरून जायला होते. साप समोर दिसताच अनेक जण मागे जाणेच पसंत करतात. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक मुलगी विशाल आकाराच्या सापासोबत खेळताना दिसून येते. मुलांना सर्वसाधारणपणे खेळण्यांसोबत खेळताना पाहिले असेल. परंतु एक मुलगी विषारी अन् मोठय़ा आकाराच्या सापांसोबत खेळण्यासह झोपताना देखील दिसून येते. ही मुलगी या सापांसोबत अत्यंत सहजपणे वावरते.
या व्हिडिओला इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला हजारोंच्या संख्येत ह्यूज मिळाले आहेत. तर युजर्स सातत्याने यावर कॉमेंट करत आहेत. मुलांच्या आईवडिलांनी अशा धोकादायक प्राण्यांसोबत मुलांना सोडू नये असेही काही जणांचे म्हणणे आहे.









