Kolhapur Crime News : मांडरे (ता. करवीर) येथे महाप्रसादामध्ये पाणी घातल्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत पाच जण जखमी झाले आहेत. काल रात्री ही घटना घडली. यानंतर १२ जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडरे (ता. करवीर) येथे काल गावातील एका तरुण मंडळाने गणपतीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी या प्रसादामध्ये एका संशियताने पाणी घातले. त्याचे नाव अभिजित अस आहे. उदय पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्याला जाब विचारला. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत क्षणाचाही विचार न करता अभिजीतने परवाना नसताना गोळीबार केला. वेळीच उदय पाटील बाजूला झाले. मात्र यावेळी झालेल्या काठी, दगडाच्या मारहाणीत उदय, संग्राम, रंगराव, अनिल आणि रोहित पाटील असे पाच जण जखमी झाले. या घटनेनंतर पाटील कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. त्यानxतर १२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी –
अभिजित सुरेश पाटील, समीर कृष्णात पाटील, सुरेश रामचंद्र पाटील, बाजीराव पांडुरंग पाटील, विशाल बाजीराव पाटील, विकास बाजीराव पाटील, दादासाहेब श्रीपती पाटील, प्रकाश शंकर भावके, सर्जेराव शंकर भावके, स्वरूप सुरेश पाटील, राहूल कृष्णांत पाटील आणि तुषार राजाराम पाटील (सर्व रा. मांडरे, ता. करवीर) अशी असल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









