Ajit Pawar On Eknath Shinde : गणेश उत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. पण याआधी कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अनेकांच्या घरच्या गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहेत. यावरुन अजित पवार यांनी निशाणा शाधला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का? याचा विचार व्हायला हवा असं ही ते म्हणाले. शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना पुढे ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती.याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असंही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








