सोनाली फोगट खूनप्रकरण
प्रतिनिधी /म्हापसा
देशभरात गाजत असलेल्या सोनाली फोगट खूनप्रकरणी हणजूण येथील कर्लीज हॉटेलचे मालक एडवीन नुनीस, ड्रग्स पॅडलर रामदास मांद्रेकर, रुम बॉय दत्तप्रसाद गावकर यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना काल शुक्रवारी येथील न्यायालयात रिमांडसाठी हजर केले असता या तिघाही संशयित आरोपींना सात दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
कर्लीजा मालक एडवीन नुनीस हेही ड्रग्स पॅडलर म्हणून काम करत असल्याचे आता चौकशीअंती उघड झाले असून त्या दिवशी 22 ऑगस्टला रात्री सोनालीला रात्री 3 वेळा एमडीएमए हे अमलीपदार्थ देण्यात आले होते, अशी हरियाणा पोलिसांना मिळाली आहे.
सोनाली फोगट उतरलेल्या लिओनी रिसॉर्टमध्ये एकदा, तर कर्लीज बारमध्ये दोनदा संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांनी सोनालीला अमलीपदार्थ दिला होता हे आता उघड झाले आहे. तिला बाटलीमधून ड्रग्स देताना सीसीटीव्ही पॅमेराचा व्हिडिओही व्हायरल झालेला आहे. कर्लीजचा मालक एडवीन नुनीस हाच या हॉटेलमध्ये येणाऱयांना ड्रग्स पुरवित होता अशी माहितीही उघड झाली आहे. मात्र गोवा पोलिसांकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याचे हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे.









