अपघाताच्या प्रमाणात वाढ : विशेष योजना राबवून बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
दिवसेंदिवस सत्तरी तालुक्मयात भटक्मया गुरांची संख्या वाढत आहे. यामुळे रस्त्यावरील अपघातांत वाढ झाली आहे. भटक्मया गुरांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने विशेष धोरण आखावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
गोवा सरकारने भटक्या गुरांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात एक विशेष मोहीम आखली होती. या मोहिमेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सत्तर तालुक्मयात 12 पंचायती व एक नगरपालिका आहे. वाळपई पालिकेने नाणूस सत्तरी येथील अखिल विश्व व संवर्धन केंद्र या ठिकाणी करार करून भटक्मया गुरांचे व्यवस्थापन करण्यासंदर्भात नियोजन केलेले आहे. वाळपई पालिका क्षेत्रातील भटक्मया गुरांवर व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गोशाळेची आहे. या संदर्भात ते कामगिरी करत असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. मात्र त्यांना आर्थिक समस्या असल्याची बाब समोर आलेली आहे. यामुळे त्यांच्यासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होताना दिसत आहे.
पंचायतस्तरावर गुरांच्या बंदोबस्ताची मोहीम अयशस्वी
तालुक्मयाच्या पंचायत क्षेत्रातील भटक्मया गुरांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी येथील एका गोशाळेला देण्यात आलेली आहे. या संदर्भाचे करार सर्व पंचायतीने या गोशाळेकडे केले होते. मात्र पंचायत स्तरावरील भटक्या गुरांचे व्यवस्थापन अद्यापही झालेले नाही. अनेक ठिकाणी भटके गुरे रस्त्यावर ठाण म्हणून बसतात. यामुळे वाहन चालकांसाठी डोकेदुखीला वाढली आहे. रस्त्यावर बसलेली गुरे रात्रीच्यावेळी स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. आठ दिवसांपासून या अपघातामध्ये वाढ झाली असून गंभीर अपघात होण्यापूर्वी सरकारने या संदर्भात विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
दरम्यान, याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्या पंचायतीने गोशाळेकडे या संदर्भाचा करार केलेला आहे. त्यांना वार्षिक ठराविक निधी देण्यात येत असतो. पंचायत क्षेत्रातील भटक्या गुरांचे व्यवस्थापन गोशाळेमध्ये होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे समजते. मध्यंतरी भटक्मया गुरासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे याचिका दाखल करण्यात आली होती. याची दखल घेत सरकारने भटक्मया गुरासंदर्भात व्यवस्थापन केलेले आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. मात्र ही प्रक्रिया केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्ष भटक्मया गुरांचे व्यवस्थापन होत नसल्याचे समोर आलेले आहे. यामुळे सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली असून याबाबत सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









