Sharad Pawar News : गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहे. यामुळे अनेक मोठ्या नेत्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच भाजप सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनीही भाष्य केलं आहे. भाजपाने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत. विरोधकांनी आता एकजूट झाले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी आगामी निवडणूकी संदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आगामी 2024 मधील लोकसभा निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो असे संकेत त्यांनी दिले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्येही सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आपल्याला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे असंही ते म्हणालेत.
नितीश आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी योग्य राजकीय निर्णय घेतला. भाजपसोबतची युती सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच कौतुक पवार यांनी केलं. त्यामुळे पुढील निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवली जाण्याची शक्यता आता बळावली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








