Mikhail Gorbachev Passes Away : शीतयुध्दाचा शेवट करणारे सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं मंगळवारी (30 ऑगस्ट) दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रशियन मीडिया रिपोर्टनुसार, मिखाईल गोर्बाचेव्ह हे मागील काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
शीतयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र, सोव्हिएत युनियनचे विघटन रोखण्यात त्यांना अपयश आले होते. गोर्बाचेव्ह यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या रुपाने जगाने एक मोठा नेता गमावला आहे. अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आँटोन गट्रेस यांनी दिली आहे. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









