सिमला / वृत्तसंस्था
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एका सिंगापूरच्या पर्यटकाने रशियन महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणाऱयाला त्वरित अटक करण्यात आली असून त्याची पाठवणी कारागृहात करण्यात आली. आरोपीचे नाव अलेक्झांडर ली जिया जून असे आहे. पिडित महिलेने पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. पिडित महिला मनाली येथे आपल्या आईसमवेत रहात होती. आरोपीने महिलेला आपल्या खोलीत बोलावून तिच्याशी दुष्कर्म केले, असे तिने तक्रारीत नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना 28 ऑगस्टला घडल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.









