भोगावती/प्रतिनिधी
कोल्हापूर ते भोगावती मार्गावरील कांडगाव ता करवीर गावाजवळील हायस्कूल समोर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात राजाराम गोविंद कांबळे ( वय ४०,रा. तळगांव, ता राधानगरी) हे जागीच ठार झाले.कोल्हापूरहून येणाऱ्या मोटारसायकलला ट्रकने पाठीमागून ठोकरल्याने हा अपघात झाला आहे.
अपघातात ठार झालेले कांबळे हे कोल्हापुरातील बोंद्रे हायस्कूल मध्ये शिपाई पदावर काम करीत होते. सद्या ते नवीन वाशी नाका परिसरातील पोद्दार इंग्लिश स्कूल जवळ राहत होते. ते आपल्या गावाकडे जात असतानाच ही दुर्घटना घडल्याचे समजते.तर अपघातातील ट्रक हा कोल्हापूर सहकारी मजूर संस्थेचा असल्याचे कळले. मोटारसायकल चा अपघातात चक्काचूर झाला असल्याने अपघाताची तीव्रता लक्षात येते.









