कणकवली : वार्ताहर-
कणकवली येथील बसस्थानकासमोर, बाळा सावंत यांच्या हॉटेलनजीक अंदाजे ६५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी रात्री २.४५ वा. सुमारास उघडकीस आली. सदरचा ज्येष्ठ रविवारी दुपारनंतर या परिसरात दिसला होता. रात्री उशिरा त्याच्या शरीराची काहीच हालचाल न दिसल्याने एकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो मयत स्थितीत आढळला. मयत गहुवर्णी असून चेहरा गोल, अंगात निळ्या रंगाचे, उभ्या रेषा असलेले फुलशर्ट, राखाडी फुलपँट आहे. मयतास कुणी ओळखत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी (०२३६७- २३२०३३) केले आहे.









