त्रिपोली
लिबियाची राजधानी त्रिपोलीमध्ये दोन बंडखोर अतिरेकी गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला. एका गटाने दुसऱया गटावर गोळीबार केल्याने चकमकी सुरू झाल्याचा दावा पंतप्रधान अब्दुल हमीद देबा यांच्या सरकारने केला. या घटनेत झालेल्या हिंसाचारात 23 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या राजकीय वादात आणखी भर पडली आहे. देशात अन्यत्रही याचे पडसाद उमटण्याची भीती निर्माण झाली आहे. या संघर्षात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 140 जण जखमी झाले आहेत.









