प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे येथे गेल्या 20 आणि 21 तारखेला उद्यान मंगल कार्यालयात झालेल्या 40 व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात ज्योतिष शास्त्रातील कर्तृत्वाबद्दल प्रा. पंडित तेजराज किंकर यांचा सत्कार करण्यात आला. या संमेलनामध्ये भारतातील वेगवेगळय़ा भागांतून नामांकित ज्योतिषी उपस्थित होते. भालचंद्र विद्यापीठ पुणे येथील चंद्रकांत जी. शेवाळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदाबादचे ज्योतिष गुरु कुवर जी., गाझियाबादचे आचार्य सागर, चंदिगडचे पं. राजेश वशि÷ आणि पुणे, मुंबई येथील विविध मान्यवर ज्योतिषी उपस्थित होते.









