प्रतिनिधी/ बेळगाव
वरेरकर नाटय़ संघ आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी पार पडला. प्रारंभी हेरवाडकर स्कूलचे प्राचार्य सुनील कुसाणे यांच्या हस्ते बक्षीसपात्र कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संघाचे सचिव जगदेश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
परीक्षकांच्यावतीने शिरीष देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात किरण ठाकुर यांनी स्पर्धेचा उद्देश सांगितला. अशा तऱहेच्या अनेक स्पर्धा भरवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपला मनोदय त्यांनी जाहीर केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व गटातील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. सुभाष देसाई यांनी आभार मानले. विजेत्या चित्रकारांचे प्रदर्शन रविवार दि. 28 रोजी सकाळी 10 ते 7 या वेळेत खुले राहील. हा संपूर्ण कार्यक्रम लोकमान्य सोसायटीने पुरस्कृत केला होता.









