मालवण / प्रतिनिधी –
जिल्ह्यातील समुद्रकिना-यांची स्वच्छता राखण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाच्या वतीने जिल्ह्याला देण्यात आलेली बीच क्लिन मशीन शुक्रवारी सायंकाळी मालवण नगरपालिका आवारात दाखल झाली आहे. मालवण शहरातून लवकरच समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेस प्रारंभ होणार आहे. या मशिनद्वारे गणेश चतुर्थी सणापूर्वी मालवण शहरातील समुद्रकिनारे चकाचक होणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.









