वार्ताहर /किणये
कावळेवाडी गावचा उदयोन्मुख मल्ल रवळनाथ कणबरकर याने नुकत्याच कडोली येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. 65 किलो वजन गटात रवळनाथने बाजी मारली. तो बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतनचा विद्यार्थी असून आठवीत शिकत आहे. सध्या सावगाव येथील मठपती कुस्ती आखाडय़ात तो सराव करीत आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे त्याची जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.









