टँकरने दिली धडक, दोन प्रवासी किरकोळ जखमी, बसमध्ये होते तब्बल 64 प्रवासी
चिपळूण प्रतिनिधी
परशुराम घाटात भरधाव वेगात असलेल्या टँकरने चिपळूणच्या दिशेने येणाऱ्या एस.टी. बसला मागून जोरदार धडक दिली. मात्र या अपघातात ही बस सुदैवानेच घाटात कोसळता कोसळता थोडक्यात बचावली आणि मोठा अनर्थ टळला. यामुळे या बसमधील तब्बल 64 प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना शुकवारी दुपारी 1.30 वाजता घडली.
दरम्यान, टँकर चालकास खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या धडकेनंतर एस.टी. बसगाडी रस्त्यालगत एका बाजूला कलंडली, तर टँकर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस मातीत अडकला.