प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरातील मारुती मंदिर येथे एका मद्यधुंद रिक्षाचालकाने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल़ी. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाल़ा तसेच कार व रिक्षाचे नुकसान झाले.
जखमी रिक्षाचालकाला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आल़े. या रिक्षाचालकाने माळनाका येथे एका पादचाऱ्यांलाही ठोकर दिल्याचे समोर आले आह़े यांनतर तो आपली रिक्षा घेवून मारुती मंदिर येथे हुंडाई आय १० या चारचाकीलाही ठोकर दिली. यावेळी चारचाकी गाडीचा मालकही तिथे उपस्थित नव्हता. ही धडक एवढी जबरदस्त होती की चारचाकी गाडीचा टायर फुटला. रिक्षाच्या डाव्या बाजूचे नुकसान झाले.









