वार्ताहर /गुंजी
दक्षिण महाराष्ट्र संचलित सह्याद्री हायस्कूल गोधोळी येथे नुकत्याच झालेल्या लोंढा विभागीय क्रीडा स्पर्धेत गुंजी मराठी माध्यमिक (आरएमएसए) हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये मुलींच्या गटातील धावणे या क्रीडा प्रकारात तीन हजार मीटर साक्षी जाधव, 1500 मीटर क्रांती बिरजे, 800 मीटर ऋतिका घाडी, 400 मीटर संतोषी पाटील, 200 मीटर ऐश्वर्या पाटील, 100 मीटर स्वाती घाडी, 5 कि. मी. चालणे मयुरी गोरल, 400 भालाफेक सरिता हेरेकर, हॅमर थ्रो मधुरा नाळकर, बुद्धिबळ श्रेया नाईक व अंकिता बाळेकुंद्री या विद्यार्थिनीनी प्रथम क्रमांक पटकाविला तर सांघिक खेळात रीले, हँडबॉल व हॉकी प्रथम तर खो-खो व थ्रोबॉल स्पर्धेत द्वितीय. मुलांमध्ये 1500 मीटर धावणे जोतिबा पाटील, 800 मीटर संकेत केसरेकर, 400 मीटर शुभम गावडा, 110 मीटर हार्डल गणराज बुरुड, 5 किलोमीटर चालणे रोहित मन्नोळकर, हातोडा फेक गोविंद कणबरकर, बुद्धिबळमध्ये नागराज मनोळकर व कुणाल कुटे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर सांघिक क्रीडा प्रकारात हँडबॉल प्रथम, रिले, खो-खो, थ्रो बॉल द्वितीय तसेच इतर क्रीडा प्रकारात द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून या क्रीडा स्पर्धेमध्ये गुंजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यासाठी शाळेचे शारीरिक शिक्षण शिक्षक जी. आर. पावसकर, मुख्याध्यापिका छाया गवाळकर, सहशिक्षिका स्मिता कुदळे, जे. एन. बडसकर, अनिता डेरेदार, दीपक जाधव, लगमण्णा नावि आदी शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.









